'वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है' : ना. जयंत पाटील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२१

'वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है' : ना. जयंत पाटील

 राष्ट्रवादीपरिवारसंवाद दौऱ्यानिमित्त आज पाचव्या दिवसाची सुरुवात नागपूर जिल्ह्यातून झाली. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पक्ष संघटनेचा आढावा घेणारी बैठक घेतली.यावेळी ते म्हणाले की, "नेत्यांची खरी ताकद कार्यकर्ते असतात. आपल्या नेत्यांच्या मागे कार्यकर्ते नेहमीच उभे राहतात. आज सभागृहात मोठी गर्दी होती, गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे सक्षमपणे उभे राहतात हे पाहून समाधान वाटले. आगामी काळात नागपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मागच्या वेळेस पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र या गोष्टी मागे टाका. 'वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है' पक्षाचे बुथ संघटन अधिक मजबूत करा, जोमाने कामाला लागा, राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा प्रसार करा."

तर गृहमंत्री ना. अनिल देशमुख म्हणाले की, "नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगलं काम करत आहोत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठत आहे. आपण विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करावे."
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिनानाथ पडोळे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ओबीसी सेलचे ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जावेद हबीब, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.