नागपूर मेट्रोच्या फेज - २ व नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाकरिता अनुक्रमे ५९७६ व २०९२ कोटी रुपयाची घोषणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ फेब्रुवारी २०२१

नागपूर मेट्रोच्या फेज - २ व नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाकरिता अनुक्रमे ५९७६ व २०९२ कोटी रुपयाची घोषणा

नागपूर मेट्रोच्या फेज - २ व नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाकरिता अनुक्रमे ५९७६ व २०९२ कोटी रुपयाची घोषणा


नागपूर,०१ फेब्रुवारी: नागपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक परिवहनाचे साधन तसेच सध्याच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज - १ ची प्रगती बघता आज केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ चा समावेश केला आहे या सोबत नाशिक येथील मेट्रो नियो प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज केंद्रीय वित्त मंत्री श्रीमंती निरमला सीतारामन यांनी लोकसभेच्या पटलावर या दोन्ही शहराच्या प्रकल्पाची घोषणा केली ज्यामध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ मध्ये रु. ५९७६ कोटी व नाशिक मेट्रो नियो करिता २०९२ कोटी रु. याची घोषणा केली आहे.   

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज - २ हा ४३.८  कि.मी लांबीचा असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे कि, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज २ ला ८ जानेवारी २०१९ व नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाला २८ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती.     

नागपूर मेट्रो फेज - २ पुढील प्रमाणे :

आटोमोटिव्ह चौक ते कन्हान : 
      लांबी : १३ कि. मी. स्टेशन : पिली नदी,खसारा फाटा,ऑल इंडिया रेडियो,खैरी फाटा,लोक विहार,लेखा नगर,कॅन्टोन्मेंट,कामठी पोलीस स्टेशन,कामठी नगर परिषद,ड्रॅगन पॅलेस,गोल्फ क्लब,कन्हान नदी            
मिहान ते बुटीबोरी ईएसआर :    
लांबी : १८.७  कि. मी. स्टेशन: ईको पार्क स्टेशन,मेट्रो सिटी स्टेशन,अशोकवन,डोंगरगांव,मोहगांव,मेघदूत सिडको,बुटीबोरी पोलीस स्टेशन,म्हाडा कॉलोनी,एमआयडीसी – केईसी,एमआयडीसी - ईएसआर

प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर :
लांबी : ५. ५ कि. मी. , स्टेशन: पारडी,कापसी खुर्द, ट्रांसपोर्ट नगर  

लोकमान्य नगर ते हिंगणा:
लांबी : ६.६ कि. मी. , स्टेशन: हिंगणा माउंट व्ह्यू,राजीव नगर,वानाडोंगरी,एपीएमसी,रायपूर,हिंगणा बस स्टेशन,हिंगणा.  

 (नाशिक मेट्रो नियो प्रकल्प) :

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो द्वारे) मुंबई शहर वगळून उर्वरित महाराष्ट्रतील मेट्रो रेल प्रकल्पाची जबाबदारी महा मेट्रो ला देण्यात आली असून यामध्ये नाशिक शहराचा देखील समावेश होता.  महा मेट्रोने नाशिक शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाचे नियोजन केले, मेट्रो नियो प्रकल्पाची संकल्पना ही नवीन असून देशात पहिल्यांदा या प्रकारचा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे.  मेट्रो नियो हा प्रकल्प अतिशय आधुनिक असून नाशिक आणि तत्सम लोकसंख्या असलेल्या शहराकरीता उपयुक्त आहे. सर्व साधारण पणे २०- ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांनकरता वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता योग्य त्या उपायावर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१९ रोजी टायरवर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाबंधी सर्व बाबींवर विचार करण्याकरता तसेच या बाबीत एक वाक्यता आणन्याकरता या समितीची स्थापना केली होती.महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली त्याच अनुषंगाने ही मेट्रो नियो संकल्पनेची अंबलबजावणी करण्यात आली जे कि, संपूर्ण देशासाठी आदर्श,दिशादर्शक आणि परिवहन क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प असेल.   

नाशिकच्या मेट्रो नियो प्रकल्पाचे ठरक वैशिष्ट्ये:
पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका :
लांबी : १० कि.मी स्टेशन :  गंगापूर,जलापूर,गणपत नगर,काळे नगर,जेहाण सर्कल,थटे नगर, शिवाजी नगर,पंचवटी,सीबीएस आणि मुंबई नाका.

दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड :
लांबी : २२ कि.मी स्टेशन : ध्रुव नगर,श्रामिक नगर,महिंद्र,शनेश्वर नगर,सातपूर कॉलोनी,एमआयडीसी,एबीबी सर्कल,परिजात नगर,मिको सर्कल,सीबीएस,शारदा सर्कल,द्वारका सर्कल,गायत्री नगर,समता नगर,गांधी नगर,नेहरू नगर,दत्त मंदिर,नाशिक रोड तसेच सीबीएस हे दोन्ही मेट्रो कॉरीडोर करता इंटरचेंज स्टेशन असेल.

महा मेट्रोच्या कार्याची प्रगती तसेच गुणवत्तापूर्ण कार्यामुळे नवीन प्रकल्प महा मेट्रोला प्राप्त होत आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - १ चे ९० % कार्य पूर्ण झाले असून सेंट्रल एव्हेन्यू,(रिच -४) आणि कामठी मार्गावर (रिच - २) डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो सेवा कार्यनव्यित होईल तसेच पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे ५०% कार्य पूर्ण झाले असून या वर्षी २ सेक्शन पुणेकरांन करता खुले होणार आहे.