#Nagpur महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ फेब्रुवारी २०२१

#Nagpur महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार #नागपूर- राज्यात रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राज्यस्तरीय #महारेशीमअभियान गावपातळीवर राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे आयोजित रेशीम चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवली.

महारेशीम चित्ररथ 15 फेब्रुवारीपर्यंत गावांमध्ये फिरणार असून, या उद्योगाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सभा घेऊन शाश्वत उत्पन्न घेता येऊ शकते. शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यात येईल. शेतकऱ्यांनी या कालावधीत नागपूर जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी करावी-जिल्हाधिकारी

राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग तसेच रेशीम संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात महारेशीम अभियान राबविण्यात येत असून, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरएफओंनी अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.