आज पद्मगंधा प्रतिष्ठान वार्षिक साहित्य संमेलन आणि पद्मगंधा कुमार साहित्य संमेलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२७ फेब्रुवारी २०२१

आज पद्मगंधा प्रतिष्ठान वार्षिक साहित्य संमेलन आणि पद्मगंधा कुमार साहित्य संमेलन
श्री शंकरराव जाधव पुरस्कृत मराठी भाषा दिवसाच्या अनुषंगाने पद्मगंधा प्रतिष्ठान २७ आणि २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आभासी पद्धतीने साहित्य संमेलन संपन्न करीत आहे. वार्षिक साहित्य संमेलनाचे उद् घाटन मा. सुमित्रा ताई महाजन माजी लोकसभा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर अध्यक्ष स्थानी * डॉ विद्या देवधर ,अध्यक्ष साहित्य परिषद तेलंगणा,या आहेत .यावेळी प्रमुख अतिथी मा.ज्ञानेश्र्वर मुळे ,सशक्त लेखक आणि भारताचे राजदूत असून अतिथी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मा.डॉ.सदानंद देशमुख हे आहेत
यावेळी पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मा.शुभांगी भडभडे यांनी प्रास्ताविक सादर करतील तर उपाध्यक्ष विजया ब्राह्मणकर यांनी मराठी दिवसाच्या निमित्याने मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त करण्यात येईल.कार्यक्रमाचा प्रारंभ सई देशपांडे यांच्या सरस्वती स्तवन आणि समारोप अंजली पारनंदी वार यांच्या पसायदानाने केला आहे. निवेदन वर्षा देशपांडे आणि संगीता वाईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती मोहरीर यांनी केले.
या वेळी २०२० चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत.


*******************************
२०२० चे राज्य स्तरीय पुरस्कार घोषित
*स्व विठ्ठलराव बोबडे/ कुसुम कमलाकर काव्यसंग्रह पुरस्कार...


जयश्री दाणी,नागपूर " दिती"
मुरलीधर खोटेले.देवरी " झाडीतला गाव"
*राम भोंडे/छाया कावळे कथा संग्रह पुरस्कार......
संगीता पुराणिक,पुणे" कोलाज"
राजेंद्र चौधरी, मुंबई" एकाकी पक्षी"
*सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार
डॉ.अनघा केसकर,मुंबई " निर्वासित"
भूपाली निसळ ," कल्लोळ तीर्थ" अहमदनगर
* स्व.मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार
डॉ .स्वाती चोरे "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित महिलोन्नती " वरूड
*स्व.विमलताई देशमुख ललित पुरस्कार
तनुजा ढेरे " मंतरलेले उन्हे"पुणे
संगीता वाईकर " योगेश्वर"नागपूर
*स्व शांताबाई शेकदार बालसाहित्य पुरस्कार..
किरण भावसार,पुणे" इरींग मिरींग"
* स्व.मालिनी राजाभाऊ बोबडे
सामाजिक पुरस्कार...
निता चापले,मुंबई
* वसुमती काकडे लघुकथा पुरस्कार
अरुण देशपांडे पुणे, " साधा माणूस"
* स्व.केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार
कोकिळा खोदनकर,नागपूर कथा " मातृत्व"
यांना देण्यात आले आहेत.
********************************
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात" लॉक डाऊन एक संधी " या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *डॉ मृणालिनी फडणवीस ,कुलगुरू सोलापूर विद्यापीठ तर प्रमुख अतिथी कौतिकराव ठाले पाटील ,साहित्य महामंडळ अध्यक्ष आहेत.या परिसंवादात मा.अमित पिंगे,लेखक अमृतसर पंजाब , मा. डॉ.मालती निमदेव समीक्षक,जयपूर राजस्थान, मा.निलेश मालवणकर,लेखक अमेरिका, आणि डॉ.आश्विन खरे भोपाळ मध्यप्रदेश या मान्यवरांनी सहभाग घेतला आहे तर निवेदन डॉ .बळवंत भोयर यांचे आहे.
*******************************
साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ दुर्गेश सोनार हे असून प्रमुख अतिथी प्रिया कालिका बापट ,मनसा क्रीएशन गोवा या असून यात निमंत्रित कवींच्या कवितांचा समावेश केला आहे.हेमांगी नेरकर,किशोर बळी,नितीन देशमुख,राजाभाऊ धर्माधिकारी,वृषाली देवकर, सुचित्रा का,पल्लवी परुळेकर,
आबेद शेख यांच्या काव्यांचा आस्वाद घेता येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा विजया मारोतकर यांचे आहे.

पद्मगंधा कुमार साहित्य संमेलन....
साहित्य संमेलना च्या दुसऱ्या दिवशी कुमारांनी कुमारांसाठी घेतलेले साहित्य संमेलन संपन्न होत आहे.आज शाळा बंद आहेत मुलांना एक मुक्त व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ,मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने जवळ जवळ दहा वर्षानंतर कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मा.शुभांगी भडभडे यांनी प्रास्ताविक सादर करून मुलांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी आशिर्वाद दिला आहे. यात उद् घाटनपासून ते समारोपापर्यंत सर्व कार्यक्रमात मुलांचा सहभाग असणार आहे .यात व्हिडीओ च्या माध्यमातून नागपुरातील विविध शाळांतील मुलांचा सहभाग तर आहेच पण नागपूर बाहेरील शाळांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला आहे.या वेळी कीर्तन ,कथाकथन, कविता,मुलाखत, एकपात्री प्रयोग, नाटय छटा,दिंडी,पथनाट्य ,नृत्य नाटिका अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शाळा बंद असल्याने किशोर वयीन मुलांना ही एक संधी आणि आनंदाची पर्वणी पद्मगंधा प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिली आहे.
कुमार साहित्य संमेलनाचे उद् घा टन अनिकेत घिसाड यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्ष हिमांश्री गावंडे या आहेत . विशेष अतिथी सोनीत सिसोलीकर आहेत.यावेळी मुलांना आशिर्वाद पर शुभेच्छा देण्यात येणार आहे तर डॉ.राजीव तांबे यांचे मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले जाणार आहे. निवेदन रेणुका मोहरीर यांचे असून या साहित्य संमेलनाचे आयोजन स्वाती मोहरीर आणि ज्योती चौधरी यांचे आहे.सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व कुमारांना पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत.सर्व सहभागी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे