दारू विक्रेत्यांनी केली काठीने मारहाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ फेब्रुवारी २०२१

दारू विक्रेत्यांनी केली काठीने मारहाण


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) -
शहरातील नाग मंदिर परिसरात मागील भागात राहणाऱ्या युवकाने घरी आलेल्या इसमास काठीने मारहाण केल्याची घटना शनिवारला घडली या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
 अक्षय मन्ने वय 30 वर्ष राहणार नाग मंदिर भद्रावती असे आरोपीचे नाव आहे अक्षय हा दारू विक्रीचे काम करतो घटनेच्या दिवशी रहूफ खा सत्तार खा पठाण वय 56 वर्षे राहणार आंबेडकर वार्ड हा आपल्या मित्रासह अक्षय च्या घरी गेला या दोघात वाद निर्माण झाला त्यातून अक्षय ने रहूफ  यास काठीने मारहाण करून जखमी केले पोलिसांनी तपासासाठी फिर्यादीला तू त्याच्या घरी का गेलास असे विचारणा केली असता त्याने याबाबत मौन धारण केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.