अर्जुनीमोरगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे सामूहिक रजा आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


०२ फेब्रुवारी २०२१

अर्जुनीमोरगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे सामूहिक रजा आंदोलन

अर्जुनीमोरगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे सामूहिक रजा आंदोलन


दोन फेब्रुवारीला सामूहिक रजा आंदोलन.संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.1फेब्रुवारी:-
उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुजोर रेती माफियांवर अटकेची कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून दिनांक 2 फेब्रुवारी रोज मंगळवारला संघटनेच्या सर्व सदस्यांनी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयातील कार्यरत तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, नायब तहसीलदार केवलराम वाढई ,नायब तहसीलदार जयश्री रंगारी या सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होणार आहेत. तशा आशयाचे विनंती अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले आहे.