मी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० फेब्रुवारी २०२१

मी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री

मी ही इंगित भाषा शिकणार -मुख्यमंत्री


जुन्नर /आनंद कांबळे

शिवजयंतीनिमित्त झालेल्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले , मी ही इंगित भाषा शिकणार म्हणजे अजित पवारांच्या मनात काय चाललंय हे मला समजेल.

किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती निमित्ताने झालेल्या सभेत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले की,!छत्रपती शिवाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत होत्या. त्यामध्ये इंगित भाषा अवगत होती. त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येत होते. तसेच आपल्या नजरेच्या इशारावर काही सूचना देत येत असत.अशी इंगीत विद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साध्य आहे.


हा धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ही इंगीतविद्या मी शिकून घेणार म्हणजे अजित पवारांच्या मनात काय चाललंय हे मला समजेल असा टोला लगावला.