अपघातात मेंडकीचे उपसरपंच ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ फेब्रुवारी २०२१

अपघातात मेंडकीचे उपसरपंच ठार

 अपघातात मेंडकीचे उपसरपंच ठारमेंडकी : ब्रम्हपुरी - मेंडकी मार्गावरील रानबोथली गावाजवळ अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक   जागीच ठार झाल्याची घटना दि.२६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली. उत्तम ऋषीजी सोनुले (वय ४०) रा. मेंडकी असे मृतकाचे नाव आहे. उत्तम सोनुले यांची नुकतीच ग्राम पंचायत मेंडकी येथे उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली होती . उत्तम सोनुले यांच्या अपघाती निधनाने मेंडकी गावात शोककळा पसरली आहे.