राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदी कपिल वानखेडे यांची नियुक्ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ फेब्रुवारी २०२१

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदी कपिल वानखेडे यांची नियुक्ती
खापरखेडा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा विदर्भात नुकताच संपन्न झाला सावनेर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष वाढविण्या करिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सावनेर विधानसभा क्षेत्रात अमर जैन व किशोर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण च्या वतीने सावनेर तालुका अध्यक्ष पदी कपिल वानखेडे यांची नियुक्ती करण्यात केली सदर नियुक्ती राष्ट्रावादी युवक कॉंग्रेस नागपुर (ग्रामीण) जिल्हा अध्यक्ष श्याम मंडपे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थिती अमर जैन, नागपुर जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी अध्यक्ष सावनेर विधानसभा यांच्या उपस्थितीत करण्यात आली या वेळी सावनेर तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून भविष्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला याचा फायदा मिळणार आहे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या विचार तळागाळात पोहचविणे काळाची गरज असल्याचे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सावनेर विधानसभा मतदार संघात मजबूत करणार असल्याचे सांगितले युवकतालूका अध्यक्ष पदावर कपिल वानखेडे यांनी सांगितले यावेळी प्रमुख उपस्थिती सावनेर तालुका अध्यक्ष रवि फुलझेले , दहेगाव (रं) ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश गजभिये, शहर अध्यक्ष रामू बसूले, भवन पटेल, अफसर खान, साबीर मिर्जा, जावेद अन्सारी, विनोद कोथरे, अमोल घाटोळे, लिलाधर येकरे आदींनी अभिनंदन केले.यावेळी नियुक्ती झाल्या बद्दल गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हा अध्यक्ष शिवराज गुजर , जिल्हा अध्यक्ष श्याम मंडपे अमर जैन , किशोर चौधरी आदीचे आभार व्यक्त केले