बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ फेब्रुवारी २०२१

बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम
झोन सभापती व नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगूलकर यांच्यामाध्यमातून हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे संपन्न झाला.

हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाअध्यक्ष श्री डॉ मंगेश गूलवाडे लाभले व त्यांनी मनोगतात सांगितले की, "गेल्या 10 वर्षापासून हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम घेऊन कल्पनाताई महीला सक्षमीकरण करण्याचे काम करीत आहे. वार्डातील महिलांच्या सहवासात राहून भारतीय जनता पार्टी पक्षाचे काम वाढवण्याचे महत्वपूर्ण कार्य करित आहे."

तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखीताई कंचल्लावार यांनी मनोगतात सांगितले की, "गेल्या 1-2 वर्षापासून लालपेठ काँलरी प्रभागातील बाबूपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती म्हणून दररोज 2-3 दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही महत्त्वाची समस्या दूर करण्यासाठी सौ. कल्पनाताई बगूलकर व भाजपचे नगरसेवक सतत महानगरपालिकेत अधिकारी व आमच्या सोबत समस्या दूर करण्यासाठी मागणी करीत होत्या व ती पाणीपुरवठयाची समस्या आता संपुष्टात आली. तूम्हची समस्या समुष्ठात म्हणेच दूरकरण्यासाठीच सौ. कल्पनाताई काम करते. वार्डातील विकासाचे काम करण्यासाठी हमेशा कल्पनाताई तत्पर असतात.*

*या कार्यक्रमाचे आयोजक सौ. कल्पनाताई बगूलकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महिला सक्षमीकरण या संबंधित माहिती दिली. माझ्याकडे येत असलेल्या गोरगरिब महिलांना रेशनकार्ड व श्रावणबाल योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधाराला आधार देण्याचा प्रयत्न करीत असते व करित राहील.*

याशूभप्रसंगी कार्यक्रमाला नगरसेविका सौ. ज्योती गेडाम, नगरसेविका सौ. शिलाताई चव्हान, नगरसेविका सौ. छबूताई वैरागडे, नगरसेवक श्री प्रदिप किरमे, सौ. मायाताई खनके, सौ. मिराताई क्षीरसागर या सर्वांची प्रमुख उपस्थितीती लाभली.

या कार्यक्रमाच्या यशषवितेसाठी भाजपा महिला कार्यकर्त्या सौ. रूपाली आंबटकर, सौ. मंजुषा पोटदूखे, सौ. अनिता चौधरी, सौ. नरतामताई, सौ. निता वैरागडे, सौ. सोनू वंजारी, सौ. अर्चना कामडे, सौ. अल्का खनके, सौ. संध्या बोबाटे यांनी कार्य केले.

या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन करतांना आलेल्या 700 महिलांना व सर्व उपस्थित मान्यवरांचे सौ. वर्षाताई आंबटकर यांनी आभार मानले.