सरपंच फलंगाताई यांचे जलसंपदा मंत्र्यांनी केले कौतुक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ फेब्रुवारी २०२१

सरपंच फलंगाताई यांचे जलसंपदा मंत्र्यांनी केले कौतुक


वाशिम - रिसोड दि. ६ फेब्रुवारी - आपल्या कारकिर्दीत गावात रस्ते... शेततळी... नद्यांचे रुंदीकरण... शाळांच्या भिंती बांधल्या... आपल्या गावाच्या विकासासाठी इतकं काही करणाऱ्या पांगरखेडाच्या सरपंच फलंगाताईं चव्हाण यांना भेटून कौतुक वाटले आणि खऱ्या अर्थाने ही ग्रेटभेट ठरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 

सरपंच फलंगाताई रमेश चव्हाण आणि त्यांचे पती आज रिसोड येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत भेटले. वाशीम जिल्ह्यातील आपल्या छोट्याशा पांगरखेडा गावाला पाणी मिळावे यासाठी सरपंच फलंगाताई चव्हाण या निवेदन घेऊन आल्या होत्या. 

जिल्ह्यातील कार्यान्वित असलेल्या योजनांच्या माध्यमातून नक्कीच सरपंच फलंगाताईंच्या पांगरखेडा गावाला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.