रोजगार हमी योजनेत भागीदारीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ फेब्रुवारी २०२१

रोजगार हमी योजनेत भागीदारीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

 रोजगार हमी योजनेत भागीदारीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित


 


               चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी :  शासनाच्या दि. 13 जानेवारी, 2021 च्या परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सिएसओ, एफपीओ, सीबीओ, एनजीओ इत्यादी स्वयंसेवी संस्थांच्या अखर्चिक भागीदारी बाबत निर्देश असून त्याअनुषंगाने विहित बाबींची पुर्तता करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून 3 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.


               अर्ज सादर करण्यासाठी  संबंधीत संस्थेची विना आर्थिक सहाय्याचे काम करण्याची तयारी असावी,  शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा, जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल. अशा स्वयंसेवी संस्थांचे प्रशासकीय संघटन आवश्यक त्या जिल्हयात असावे. सदर स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पोर्टलवर नोंदणीकृत असावी.


               उपरोक्त निकषांची पुर्तता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी दि. 03 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.  स्वयंसेवी संस्थांची निवड प्राप्त अर्जानुसार प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून मुलाखतीचा वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.