इंटर मोडल स्टेशनमुळे स्वच्छ, प्रदूषण मुक्त तसेच हरित नागपूरचे स्वप्न साकार होईल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ फेब्रुवारी २०२१

इंटर मोडल स्टेशनमुळे स्वच्छ, प्रदूषण मुक्त तसेच हरित नागपूरचे स्वप्न साकार होईल

इंटर मोडल स्टेशनमुळे स्वच्छ, प्रदूषण मुक्त तसेच हरित नागपूरचे स्वप्न साकार होईल
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन


 अजनी रेल्वे स्थानकाजवळील  आय एम एस प्रकल्पाबाबत आढावा बैठक गडकरींच्या अध्यक्षतेखाली संपन्न


नागपूर:नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एन.एच.ए.आय.) बांधले जाणारे इंटर मोडल स्टेशन अर्थात आय एम एस हे पर्यावरण पूरकरीत्या  बांधले जाईल आणि यामुळे स्वच्छ, प्रदूषणमुक्त तसेच हरित नागपूरचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल. या प्रकल्पाच्या पहिल्या चरणात भू-संपादन आणि रेल्वे विभागाचे पुनर्वसन हे प्राधान्य राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केलं. स्थानिक  हॉटेल सेंटर पॉईंट येथे आय एम एस प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी  संवाद साधत होते. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य मनोज कुमार नागपूर एन.एच.ए.आय.चे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल , नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी,आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते , प्रविण दटके  उपस्थित होते.

नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशन नजीक रस्ते,रेल्वेमेट्रोब्रॉड गेज मेट्रो   तसेच नव्याने प्रस्तावित नाग नदीचा जलमार्ग  हे सर्व एकत्रित येऊन या स्टेशन पासून सर्व मार्गाने प्रवाशांना वाहतूक करण्यासाठी  एक इंटर मोडल स्टेशन बनणार आहेया इंटर मोडल स्टेशन साठी रेल्वे, सिंचन विभाग,भारतीय खाद्य महामंडळ तसेच महाराष्ट्र शासनाच्या काही जागेचे संपादन आवश्यक आहे. या जागेच्या संपादनाबाबत संबंधित यंत्रणांनी त्वरित  कार्यवाही   करावी अशा सूचना गडकरींनी सदर बैठकीत दिले.रेल्वे  कर्मचाऱ्यांच्या रहिवाशी कॉलनी  खेळाची मैदानेशाळा यांचे पुनर्वसन करुन सदर सुविधा   सद्यस्थितीत आहेत  त्यापेक्षा चांगल्या स्थितित मिळतील अशी  ग्वाही गडकरी यांनी दिली.

प्रकल्पाच्या  बांधकमामध्ये जेसीबी कंपनीला  सीएनजीवर संचलित  मशिनरी वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून यामुळे डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी होणार आहेआय एम एस मध्ये सर्वात जास्त अंतर्भाव  हा इलेक्ट्रिकचा  असणार असून  यामुळे  या पर्यावरणपुरक प्रकल्पाला हातभार लागेल   .  सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा पेट्रोल-डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा आणि पर्यावरणाचे संवर्धन करावे असे आवाहन गडकरी यांनी  केले. या प्रकल्पाच्या कामात कमीत कमी झाडे पडतील याची दक्षता  घेतली जाईल.  काही झाडे तोडावी लागली  तर त्या मोबदल्यात त्याचं  प्रतिरोपण (ट्रान्सपाल्टेंशन)  सुद्धा करण्यात येईल  असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं .

  या प्रकल्पाला 200 एकर जागेची आवश्यकता असून सध्या उपलब्ध  44.5 एकरवर हे काम चालू होणार आहे .हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर  लाख प्रवासी क्षमता या स्टेशनवर येण्याची शक्यता असल्याच   गडकरी यांनी सांगितलं. याच आय एम एस पासून शहरातील रिंग रोड पर्यंत अडथळा-विहिरीतसिग्नललेस  वाहतुकीसाठीसुद्धा वाहतूक व्यवस्थेचा   प्रारंभ करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितलं . या रिंगरोडवर प्रतिरोपण केलेली झाडे लावण्यात येणार असून हे रस्ते हरित मार्ग बनविण्यात येतीलसदर प्रकल्प  हा स्वयं - सक्षम असून यासाठी लोकप्रतिनिधीनागरिक प्रसारमाध्यमे  स्वयंसेवी संस्था तसेच इतर हितधारकांना या प्रकल्पासंदर्भातील सकारात्मक सूचना देण्याचे आवाहनही गडकरी यांनी  केलं . या प्रकल्पाद्वारे सुमारे 10 हजार युवकांना रोजगार मिळेल तसेच यात असणारे फूड कोर्टरिटेल स्टोर  आणि  इतर सुविधा सुद्धा कमी दरात सर्वसामान्य नागरिकांना  वापरायला मिळतील. हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी 2तेवर्ष लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.  

लॉजिस्टिक हब वर्ध्यापर्यंत येण्यासाठी सकारात्मक असून नागपूर शहरातील सर्व गोडाऊन हे जर सिंदी येथील ड्राय  पोर्टला नेले तर