रेल्वे रुळावर एका अज्ञात युवकाचे प्रेत नवेगावबांध देवलगाव रेल्वेस्टेशन परिसरातील घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ फेब्रुवारी २०२१

रेल्वे रुळावर एका अज्ञात युवकाचे प्रेत नवेगावबांध देवलगाव रेल्वेस्टेशन परिसरातील घटना

रेल्वे रुळावर एका अज्ञात युवकाचे प्रेत नवेगावबांध देवलगाव रेल्वेस्टेशन परिसरातील घटना

संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि. 26 फेब्रुवारी:-


येथील देवलगाव रेल्वे स्टेशन पासुन देवलगाव च्या दिशेने 1 ते दिड किलोमीटर दूर अंतरावर एका अज्ञात युवकाचे प्रेत आढळले आहे. सदर मृतकाची ओळख अजून पटलेली नाही. काल दिनांक 25 फेब्रुवारी रोज गुरुवारला एका अज्ञात युवकाचे प्रेत रेल्वे रुळाच्या मध्यभागी पडलेले आढळले. काल बाजाराचा दिवस असल्याने अनेकांना हे प्रेत दिसले. काही व्यक्तींनी काल सायंकाळच्या सुमारास एक रेल्वे मालगाडी गेल्यानंतर रेल्वे स्टेशन कार्यालयात ही माहिती दिली. त्यानंतर स्टेशन अधीक्षक कार्यालयाने याबाबतची माहिती नवेगावबांध पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे हलविले आहे.

 सदर मृत व्यक्तीचे वय  अंदाजे 25 ते 30 वर्षे आहे .अंगात शेवाळी रंगाचा शर्ट असून, निळा बर्मुडा घातलेला आहे. सदर अनोळखी पुरुष रेल्वे रुळाच्या मध्य भागी पडलेला होता. डोक्याला मार लागलेला आहे.अद्यापही या अज्ञात मृतकांची ओळख पटलेली नाही. ज्यांना कुणाला ओळख पटली असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे कळवावे. असे आवाहन नवेगाव बांध पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.