आरोग्यविभागाचा पेपरमध्ये सर्वत्र गोंधळ #health #exma - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ फेब्रुवारी २०२१

आरोग्यविभागाचा पेपरमध्ये सर्वत्र गोंधळ #health #exmaआज झालेल्या आरोग्यविभागाचा पेपर मध्ये सर्वत्र गोंधळ , नियमबाह्य पध्दतीने परीक्षा घेण्यात आली . ठिकठिकाणी विद्यार्थी संतप्त , विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. 

आजच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला गोंधळ आणि नियमबाह्य पद्धत बघता , हे ठळकपणे दिसते की परीक्षा ही अयोग्य पद्धतीने घेण्यात आली आहे , यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक , शारीरिक , आर्थिक  त्रास सहन करावा लागला आहे, आणि हे कदापि खपवून घेतले जाणार नाही . 

या सर्व गोष्टींची रीतसर चौकशी होऊन ही आज झालेली परीक्षा रद्द करून , हीच परत परीक्षा नियमात राहून परत घेण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन करण्याचे संकेत , यंग चांदा ब्रिगेड चे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख तसेच भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ दुर्गे ( अलद.) यांनी केली आहे .