सहा.कामगार आयुक्त यांचा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला अल्टीमेटम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ फेब्रुवारी २०२१

सहा.कामगार आयुक्त यांचा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला अल्टीमेटम
कोविड योद्ध्यांचे डेरा आंदोलन..
कामगार विभागातील बैठक७ महिन्याचा थकीत पगार देण्यात यावा तसेच २ वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन लागू करावे या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांनी ८ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू केलेले आहे.मुलं-बाळं व कुटुंबासह कोविड योध्द्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारीला दुपारी १ वाजता सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी आपल्या कक्षामध्ये तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ राजेंद्र सुरपाम व प्रशासकीय अधिकारी संजिव राठोड तसेच सतिश येसांबरे, अमोल घोडमारे , कांचन चिंचेकर ज्योती कांबळे, सुनिता रामटेके, शेवंता भालेराव, भाग्यश्री मुधोळकर, सीमा वासमवार, माया वांढरे,अमिता वानखेडे, सुमित्रा थोरात, सपना बांबोंळे, रीना नाकाडे, गीता मून,भारती पचारे, अरुणा पुन्नावार, अश्विनी नोमूलवार इत्यादी कामगार उपस्थित होते. 

या वेळी २ वर्षांपूर्वी शासनाने किमान वेतनाच्या दरानुसार निविदा प्रक्रिया काढण्यासाठी निधीची तरतूद करून मंजुरी दिली.परंतु वैद्यकीय महाविद्यालयाच्या भ्रष्ट कारभारामुळे ५०० कामगार दोन वर्षापासून किमान वेतनापासून वंचित आहेत. तसेच मागील ७ महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार तातडीने देण्यात यावा. तसेच दोन वर्षांपासून कमी मिळालेल्या पगाराची थकबाकी देण्यात यावी अशी मागणी 'जनविकास' चे देशमुख यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडे केली. बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ.सुरपाम व प्रशासकीय अधिकारी राठोड यांनी थकित पगार देण्याबाबत तसेच किमान वेतनाच्या प्रश्नावर शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्यामुळे निश्चित तारीख देता येणार नाही असे उत्तर दिले.

मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या उत्तराने सहाय्यक कामगार आयुक्त यांचे समाधान झाले नाही.त्यामुळे १५ दिवसांमध्ये कामगारांचे थकीत पगार व दोन वर्षात किमान वेतनापेक्षा कमी मिळालेली रक्कम कामगारांना देण्यात यावी असे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त पाटणकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना दिले. तसेच या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्याचा इशारा सुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिला.