प्रशिक बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन #Greetings #Ramabai Ambedkar - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ फेब्रुवारी २०२१

प्रशिक बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन #Greetings #Ramabai Ambedkar

प्रशिक बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना अभिवादनसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.8 फेब्रुवारी:-
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व समस्त बहुजनांच्या आई, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना प्रशिक बुद्धविहारात दि.7 जानेवारीला अभिवादन करण्यात आले.
यावेळी हरिश्‍चंद्र लाडे, नगर बौध्द समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे,उपाध्यक्ष राजेंद्र साखरे ,हेमचंद लाडे,दूर्योधन राऊत,भीमाबाई शहारे, शीतल राऊत,शालिनी लांजेवार अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवाद करण्यात आले.
अतिथींचे रमाबाईंच्या जीवनावर भाषणे झालीत.गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती... भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात होती" यावेळी गाण्यात आलेल्या या गीताने परिसर व उपस्थित भारावून गेले.
यावेळी महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.