जिल्हा परिषदेत आता मिळणार ताजा भाजीपाला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ फेब्रुवारी २०२१

जिल्हा परिषदेत आता मिळणार ताजा भाजीपाला

जिल्हा परिषदेत आता मिळणार ताजा भाजीपालापंचायत राज समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांच्या हस्ते मार्टचे उदघान

चंद्रपूर,ता.11 : उमेद अभियानाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्ट अंतर्गत भाजीपाला  शेतमाल उत्पादनाचे विक्री केंद्राचे आज उदघाटन करण्यात आलेपंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमुलकर यांनी या मार्टचे उदघाटन केले.

उमेद अभियानातील स्वंयसहायता समुहांना अधिकाधिक बाजारपेठ मिळावीयासाठी ठिकठिकाणी  समुह संचालित मार्ट सुरू करण्यावर अभियानाचा भर आहेयाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वयंसहायता समुहांच्या महिलांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मिळावायासाठी जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्ट मध्ये ताजा भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आज पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमुलकर यांनी विक्री केंद्राचे उदघाटन केलेयावेळी इतर समिती सदस्यांसह आमदार किशोर जोरगेवारमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेप्रकल्प संचालक शंकर किरवेजिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होतेचंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उमेद अभियानातील स्वयंसहायता समुहांची उत्पादने येथे विक्री केली जाणार आहेकार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकरसंदीप घोंगेगजानन भिमटेनरेंद्र नगराळेप्रफुल्ल भोपळेप्रवीण फुकेसोनल जांभुळकर यांनी सहकार्य केले.