एमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ फेब्रुवारी २०२१

एमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना

एमपीएससी व युपीएससी परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण योजना 

 📌तीन हजार विद्यार्थ्यांना लाभ 

 📌 माजी शिक्षण मंडळ सदस्य मिलिंद वानखेडे यांचे आवाहन 

 📌 ओबीसी व भटके विमुक्त विद्यार्थी पात्र

 नागपूर - राज्यातील ओबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनिक व सनदी अधिकारी बनण्यासाठी महाज्योती तर्फे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संधीचा ५ मार्च २०२१ पर्यंत पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समिती संघटक व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गातील युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात एमपीएससी व युपीएससी या परीक्षांना सामोरे जावून यश मिळावे, म्हणुन या स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाज्योतीने हाती घेतला आहे. या आर्थिक वर्षात एमपीएससी साठी दोन हजार तर युपीएससी साठी हजार विद्यार्थ्यांना असे एकंदरीत तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये ओबीसी भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यामधील नाॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्र धारक विद्यार्थी विद्यार्थींनी पात्र ठरणार आहेत. २०२२ या वर्षात होणार्‍या एमपीएससी व युपीएससी परीक्षेसाठी, या वर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी सुध्दा पात्र ठरणार आहेत. यासंदर्भात महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळांवर ५ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, विनामुल्य नोंदणी करावी, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना चा संदर्भ लक्षात घेवून, सध्या आॅन लाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यासाठी आवश्यक टॅब, स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट सुविधा सुध्दा शासनाच्या महाज्योती संस्थेच्या वतीने (महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर) विनामुल्य देण्यात येणार आहे. कोरोनाचा कालखंड संपला, तर राज्यातील नामांकित एमपीएससी व युपीएससी कोचिंग क्लासच्या माध्यमातुन बार्टी च्या धर्तीवर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार असुन, त्या कोचिंग क्लास ची फी ही महाज्योती देणार आहे. या शिवाय पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुध्दा देण्यात येईल! महाज्योतीच्या या एमपीएससी व युपीएससी मोफत प्रशिक्षण योजनेचा ओबीसी भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांनी सुध्दा या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, मुदतीमध्ये महाज्योतीच्या संकेतस्थळांवर नोंदणी करावी असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे, संघर्ष वाहिनीचे संघटक दिनानाथ वाघमारे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, मुकुंद अडेवार, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये, भाजप आघाडीचे अध्यक्ष किशोर सायगन, नामा जाधव, गोपीनाथ मुंडे विचारमंचचे अध्यक्ष शेषराव खार्डे, दिनेश गेटमे, महेश गिरी, कमलेश सहारे, संजय भोयर, गणेश उघडे, अविनाश बडे, अनील राऊत, धिरज भिसीकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे ----------------------------------------

 (प्रतिक्रिया) 

 मोफत स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - बबनराव तायवाडे महाज्योती या संस्थेमार्फत तब्बल तीन हजार ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रवर्गाच्या राज्यातील विद्यार्थ्यांनी २०२२ या वर्षात होणार्‍या एमपीएससी व युपीएससी परीक्षेसाठी, या वर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी सुध्दा पात्र ठरणार आहेत. यासंदर्भात महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळांवर ५ मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, विनामुल्य नोंदणी करावी. प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे.