दिव्यांग बांधवाच्या विवाह सोहळ्यात निशुल्क कटिंग दाढी! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ फेब्रुवारी २०२१

दिव्यांग बांधवाच्या विवाह सोहळ्यात निशुल्क कटिंग दाढी!

 दिव्यांग बांधवाच्या विवाह सोहळ्यात निशुल्क कटिंग दाढी!चंद्रपूर :- दरवर्षी आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा चंद्रपूर, स्वर्गीय गौरव बाबु पुगलिया संगणीकृत उपवर-वधू सुचक केंद्रा तर्फे दिव्यांग बांधवाचा सामूहिक विवाह सोहळा दिनांक 14/ 2 /2021 ला गौरव सेलिब्रेशन लॉन येथे होत आहे. हा विवाह सोहळा 18 वर्षांपासून सुरू आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर तर्फे दिव्यांग बांधवाच्या विवाह सोहळ्यात दरवर्षी वरांचे तसेच दिव्यांग पाहुण्यांचे निशुल्क कटिंग दाढी करीत असतात. हा हर्ष दिव्यांग बांधवाच्या वाटेकरी म्हणून नाभिक समाज दरवर्षी या कार्यक्रमात आपली सेवा प्रदान करीत असतो.  हा कार्यक्रम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर  तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सलून  संघटनेचे अध्यक्ष राजू कोंडुस्कर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.  यावेळी बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम भाऊ राजूरकर,  संघटनेचे अविनाश मांडवकर,  सुनील कडवे,  विशाल कडवे,  पांडुरंग चौधरी,  विनोद भगत,  जांभुळकर, सौरभ कोंडस्कर,  अक्षय चौधरी,  तसेच नाभिक समाज बांधवांची उपस्थिती होती.