किल्ले रायगडावरील रोषणाई बघून संभाजीराजे छत्रपती भडकले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ फेब्रुवारी २०२१

किल्ले रायगडावरील रोषणाई बघून संभाजीराजे छत्रपती भडकले
भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे, अशी टीका खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.
त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे.
एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो, असे हिट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.


दरम्यान ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली आहे, असे वृत्त खाजगी टीव्ही माध्यमातून दाखविण्यात आले होते.