गट ग्रामपंचायत परसोडी रैयत येथे महाविकास आघाडीचा झेंडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ फेब्रुवारी २०२१

गट ग्रामपंचायत परसोडी रैयत येथे महाविकास आघाडीचा झेंडा

 गट ग्रामपंचायत परसोडी रैयत येथे महाविकास आघाडीचा झेंडा.

सरपंच रंजना वाडगुरे तर उपसरपंच पदी दयाराम लंजे.


संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.13 फेब्रुवारी:-


अर्जुनी/मोर. तालुक्यातील गट ग्रामपंचायत परसोडी रैयत  येथील ग्रामपंचायतीच्या 11फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. सरपंचपदी  युवा महिला नेतृत्व रंजनाताई आत्माराम वाडगुरे आणि उपसरंचपदी अनुभवी व समाजसेवेचा वारसा लाभलेले  दयाराम लंजे यांची स्पष्ट बहुमताने निवड झाली आहे.लोकसहभागातून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा विकास करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच यांनी मनोदय व्यक्त केला.त्यांना महाविकास आघाडीचे नवनिर्वाचीत सदस्य गुलाब साखरे, प्रकाश कोरे,शालिनी वरकडे, देवांगणा कावळे यांचे सहकार्य लाभले.निवडणूकित अध्यासी अधिकारी म्हणून सुरेश हरिनखेडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी तलाठी चचाने,ग्रामसेवक मानकर उपस्थित होते.

 परसोडी रैयत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व   ग्रामवासियांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.