ट्रॅक्टर ट्राली च्या धडकेत विद्युत खांब कोसळळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ फेब्रुवारी २०२१

ट्रॅक्टर ट्राली च्या धडकेत विद्युत खांब कोसळळे

 ट्रॅक्टर ट्राली च्या धडकेत विद्युत खांब कोसळळे

सुदैवाने जीवितहानी नाहीसंजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि. 28 फेब्रुवारी:-

आजदि.28फेब्रुवारी रोज रविवारी दुपारी 3.00 वाजेच्या दरम्यान पशुवैद्यकीय दवाखाणन्या जवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्राली चा विद्युत खांबाला धडक बसल्यामुळे विद्युत खांब तुटून एका टेम्पोवर कोसळला. या झालेल्या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. विद्युत प्रवाह बंद झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35,एजी  4790,  ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एफ 5148    वऱ्हाड घेऊन बालाजी मंदिराकडे जात होते. तर विरुद्ध दिशेने आयशर टेम्पो क्रमांक एमएच 36, ए 1874 डीजे चे साहित्य घेऊन येत होते.येथील पशुवैद्यकीय वैद्यकीय दवाखान्या समोरील गोंधळे टी स्टॉल जवळील रस्त्यालगत असलेल्या खांबाला क्राशिंग होत असताना ट्रॅक्टर ट्रॉली खांबाला आदळली. त्यामुळे विद्युत खांब तुटून टेम्पो वर कोसळला. तात्काळ विद्युत प्रवाह बंद झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रॅक्टर ट्रॉली त 25 ते 30 च्या महिला लहान मुले बसले होते. सुदैवाने ते थोडक्यात बचावले, सर्व सुखरूप आहेत. विद्युत प्रवाह वेळीच बंद झाल्याने कुठलीही जीवित हानी या दुर्घटनेत झाली नाही.