एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबी येथे 'डिजिटल क्लास रूम'चे उद्घाटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० फेब्रुवारी २०२१

एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबी येथे 'डिजिटल क्लास रूम'चे उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तआवाळपूर :-
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने 'एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल, बिबी' येथे 'डिजिटल क्लास रुम' चे उद्घाटन शाळेचे संचालक प्रा. आशिष देरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोनाच्या काळात गेली 10 महिने शाळा बंद होती. या काळात विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले याचाच विचार करून एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल चा प्रशासनाने उत्तम शिक्षण पध्दती साठी प्रसिद्ध असलेल्या लीड स्कूल सोबत करार करून नवीन डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे ठरविले. लीड स्कूल च्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले. याप्रसंगी लीड स्कूल चे व्यवस्थापक अमोल सर यांनी लीड स्कूल ची संकल्पना व लीड स्कूल ही एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एका नवीन पद्धतीने कशाप्रकारे कार्य करेल याविषयी माहिती दिली.
       
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सचिन आस्वले, लीड स्कूल चे शाळा व्यवस्थापक अमोल बोन्द्रे, निखिल बोढे, पल्लवी बोढे, शाळेचे मुख्याध्यापक नितेश शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रुपाली पानसे तर आभार प्रदर्शन शिक्षिका स्नेहल लोडे यांनी केले.