आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते धाबा येथील कोंडय्या महाराज जन्म जयंती घटस्थापना - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, फेब्रुवारी १४, २०२१

आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते धाबा येथील कोंडय्या महाराज जन्म जयंती घटस्थापनादेशभरातील कोरोना चा कहर हा संपताच संपेना,अशा परिस्थितीत शासनाने जमावबंदी लादल्याने कोणतेही भाविक किंवा सामजिक कार्यक्रम करण्यास शासनाने बंदी लावली.त्यामुळे यावर्षी धाबा येथील कोंड्या महाराज यात्रा महोत्सव हा थाटामाटाने न करता....घटस्थापना करून जयंतीची सांगता करण्याचे योजिले होते.

      आज कोंडय्या महाराज धाबा जन्म  जयंती निमित्त राजुरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान लोकप्रिय आमदार मा.श्री.सुभाष भाऊ धोटे यांचे सपत्नीक कोंडय्या महाराज जयंती महोत्सवाची घटस्थापना करण्यात आली व पालखी महोत्सवाला सुरवात करण्यात आली.

      घटस्थापना कार्यक्रमाला प्रामुख्याने  नामदेव सांगडे माजी सरपंच धाबा,देवीदास सातपुते सरपंच पो,संतोष बंडावार यु. कॉ.अध्यक्ष,सचिन फुलझेले,अशोक भाऊ रेचनकर, श्री.अमर बोडलावार अध्यक्ष कोंडय्या म.संस्थान धाबा, किशोर अगस्ती,साईनाथ कोडापे,जितेंद्र गोहने,बालाजी चनकापुरे, मोहन डोंगरे,अनुराग फुलझेले,आनंदराव कोडापे,नीलकंठ लखमापूरे,संजय झाडे,विजय एकोनकर,सुषमा विलास चंद्रागडे,रवींद्र बोरकुटे, कवडू भाऊ कुबडे,अर्पणा ताई  अशोक रेचंनकर, वैशालीताई कांताराम म्हशाखेत्री,विनोद भुरकुंडे,बाळू आत्राम,अशोक चद्रागडे,सुधाकर भाऊ झाडे सोबतच धाबा परिसरातील  नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य तथा कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते...