रामाळा तलावाच्या खोलीकरणासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडणार - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ फेब्रुवारी २०२१

रामाळा तलावाच्या खोलीकरणासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडणार - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

 


रामाळा तलावाच्या खोलीकरणासाठी  प्रधानमंत्री खनिज विकास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडणार - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

इको प्रो च्या अन्नत्याग सत्याग्रह स्थळी हंसराज अहीर यांची भेट        चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभल असतांना गोंडकालीन रामाला तलाव म्हणजे चंद्रपूर महानगरातील ऐतिहासिक वारसा लाभलेली सुंदर संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करने हे सामाजिक जबाबदारी असतांना इको प्रो च्या माध्यमातून या रामाळा तलावाचे खोलीकरण करून संवर्धन करण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाकडे प्रशासनाने त्वरित दखल घेत खोलीकरणाचे कार्य हाती घ्यावे असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. इको प्रो संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात रामाळा तलाव येथे सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह स्थळी भेट प्रसंगी अहीर बोलत होते.
       प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे, इतिहास संशोधक टी टी जुलमे, युवा नेते रघुवीर अहीर, भाजप जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष राजू घरोटे, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विनोद शेरेकी, गंगाधर कुंटावार, साईनाथ मास्टे, महेश अहीर, तुषार मोहुर्ले, राहुल बोरकर, यश ठाकरे, भूषण पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        रामाळा तलावाचे खोलीकरण व्हावे हि इको प्रो ची मागणी अतिशय रास्त असून त्यांच्या पाठपुरावाही यामध्ये महत्वपूर्ण आहे. जिल्हा प्रशासनाने हे चंद्रपूर चे वैभव  टिकविण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. प्रधानमंत्री खनिज विकास निधी च्या माध्यमातून अथवा सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून हे खोलीकरणाचे काम प्रशासनाला हाती घेता येऊ शकत व त्यासाठी आपण स्वतः जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करून आग्रही भूमिका घेणार असल्याची माहिती यावेळी हंसराज अहीर यांनी दिली.
       इको प्रो चे बंडू धोतरे यांची ऐतिहासिक रामाळा तलावाचे संवर्धन प्रकरणी भूमिका नक्कीच योग्य असतांना त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व्हावे हि अपॆक्षा तर आहेच सोबतच त्यांनी आपल्या स्वास्थ्याची चिंता करीत अन्नत्याग सत्याग्रह मागे घेण्याची विनंतीही यावेळी अहीर यांनी इको प्रो चे बंडू धोतरे व त्यांच्या टीम ला केली.