पाच लाखाचा दारूसाठा जप्त आरोपी फरार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ फेब्रुवारी २०२१

पाच लाखाचा दारूसाठा जप्त आरोपी फरार


 

शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती) : 

नागपुर चंद्रपुर मुख्य मार्गावरील कोंढा फाट्यावर  अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा  पाठलाग करून  वाहन ताब्यात घेतले असता  यातील वाहन चालक पसार झाला असून वाहनातील दारूसाठा जप्त करण्यात आला ही कारवाई पहाटे दरम्यान करण्यात आली.

  नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गाने  दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता एम एच  40 A 6560  हे वाहन दारू घेऊन येत असताना पोलिसांची नाकाबंदी पाहून  मागेच वळण घेऊन भरधाव वेगाने जात असताना  पोलीसांनी पाटलाग केला   ते वाहन कोंढा  मार्गावर थांबवून  यातील वाहन चालक पसार झाला  पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात देशी विदेशी दारू किंमत पाच लाख व वाहन असा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला .ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन जगताप, हेमराज प्रधान , शशांक बदामवार, केशव चिटगिरे,  सचिन गुरनुले यांनी केली.