#Covid19 #Chandrapur गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 13 पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ फेब्रुवारी २०२१

#Covid19 #Chandrapur गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 13 पॉझिटिव्हØ  आतापर्यंत 22,625 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 101

 

चंद्रपूर, दि. 5 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 13 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 118 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 625 झाली आहे. सध्या 101 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख दोन हजार 827 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 77 हजार 500 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुक्यात एक, मूल दोन व राजूरा येथील एक रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.