राज्यात लॉकडाऊनचे संकेत? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ फेब्रुवारी २०२१

राज्यात लॉकडाऊनचे संकेत?

उद्या कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री बैठकराज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने चिंता सतावत असून, पुन्हा एकदा लाकडाऊन करायचे काय ? यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची बैठक 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

चाचण्यांचे प्रमाण कमी असूनही सकारात्मक रुग्णालय रुग्णाची संख्या वाढत असून, प्रतिबंधात्मक उपाय आणि काळजी घेण्याची गरज आहे. 

 मागील आठवड्यापासून रोजच्या चाचण्यांची संख्या पुन्हा कमी झाली असून बाधितांची संख्या वाढत आहे. मुळात क्षमतेच्या ५० टक्केच चाचण्या होत असून पूर्ण क्षमतेने त्या केल्यास हा कल पाहता बाधितांची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मृत्यूसंख्येवर बèयापैकी नियंत्रण आले आहे. एखादा बाधित निघाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध संपला असल्याने आणि त्याची तसदी घेतली जात नसल्याने लोकही चाचणी केंद्रांवर फिरकत नाहीत. प्रयोगशाळांत संपूर्ण क्षमतेने चाचण्या होत नसून १०० टक्के क्षमतेने केल्या जाव्यात, असे खुद्द आरोग्यमंत्र्यांंनी डिसेंबर महिन्यात निर्देश दिले होते. प्रत्यक्षात काय होतेय, हे रोजच्या चाचण्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. सध्या होत असलेल्या चाचण्यांची व बाधितांची संख्या हा कल लक्षात घेतला तर रोजच्या चाचण्यांची संख्या वाढल्याने दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.