नागपूर महानगरपालिकेला सिनेमॅटिक स्क्रीनचे लोकार्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ फेब्रुवारी २०२१

नागपूर महानगरपालिकेला सिनेमॅटिक स्क्रीनचे लोकार्पणनागपुर - मधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीपर तसेच महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव चित्रपटांच्या माध्यमातून वृद्धिगंत करण्याच्या हेतूने नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृह सिनेमॅटिक स्क्रीनचे नागपूर महानगरपालिकेस आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या स्क्रीनवर शेतकऱ्यांना उपयोगी असे महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठातर्फे तसेच इतर संस्थातर्फे चित्रफित तयार करून शेतकऱ्यांना दाखवण्यात येतील. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूर महानगरपालिकेची ही भव्य वास्तू एक प्रशिक्षण केंद्र बनेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला . युएफओ मूव्हीज आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूर च्या वतीने या सिनेमॅटिक स्क्रीन लोकार्पण आज त्यांच्या हस्ते संपन्न झालं. याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते