छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे भयमुक्त शासन - आ. किशोर जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ फेब्रुवारी २०२१

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे भयमुक्त शासन - आ. किशोर जोरगेवार

 छत्रपती शिवाजी महाराजांचे  हिंदवी स्वराज्य म्हणजे भयमुक्त शासन - आ. किशोर जोरगेवार
       शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  शिवरायांच्या राज्यात सर्व धर्मातील नागरिकांना समान न्याय दिल्या जायचा. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते. त्यामूळेच शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे भयमुक्त शासन होते असे  प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी  केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य मराठी बाना मित्र परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात  जयंती  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  शिवभक्त हर्षल कानमपेल्लीवारपिंदु धिरडेअभिलाष कुंभारेरामजी हरणेसौरभ डोंगरेराम जंगमसुनिल पाटिलराहुल दुपारेसोनु चावरे आदिंची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन  अभिवादन केले. या ठिकाणी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना भेट वस्तु देण्यात आल्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी फक्त जयघोष करून चालणार नाही तर त्यांचे विचारही अंगिकारले गेले पाहिजे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.