समाजरत्न पुरस्काराने चंद्रशेखर तिरपुडे सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ फेब्रुवारी २०२१

समाजरत्न पुरस्काराने चंद्रशेखर तिरपुडे सन्मानित

 समाजरत्न पुरस्काराने चंद्रशेखर तिरपुडे सन्मानित
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.9.

बाराभाटी येथील रहिवासी चंद्रशेखर तिरपुडे यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजरत्न संविधान मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महात्मा फुलेआर्थिक विकास महामंडळ व्यवस्थापक विनोद ठाकुर, बार्टी चे व्यवस्थापक हृदय गोडबोले, समतादूत शारदा कळसकर, शब्बीर भाई पठाण, पुरुषोत्तम मोदी, शिव नागपुरे यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते.

 अतिथींच्या हस्ते चंद्रशेखर तिरपुडे यांना संविधानाची प्रत,शाल व श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अतुल सतदेवे  यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिशा मेश्राम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक महेंद्र कठाणे यांनी मानले.


त्यांचे  दलितमित्र सुखदेवरावजी दहिवले,मालीनीताई दहिवले, प्रज्ञा शिक्षण संस्था येरंडीचे सर्व पदाधिकारी, वर्षा तिरपुडे, प्रभाकर दहिकर, मुन्नाभाई नंदागवळी,लिखेश  मेश्राम ,नितीन कांबळे, धम्म दिप मेश्राम , जनहिताय वाचनालयाचे  सर्व सदस्य, मित्रपरिवार व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.