अल्ट्राटेक व्दारे सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ फेब्रुवारी २०२१

अल्ट्राटेक व्दारे सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजनआवाळपूर :-
अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे नुकतेच नांदा फाटा येथील वॉर्ड क्र ५ मध्ये ११० मीटर सिमेंट काँक्रिट रोड चे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे यूनीट हेड मा. विजय एकरे, यांच्या मार्गदर्शनात, उपव्यवस्थापक मा. संजय शर्मा, कर्नल दिपक डे, सतीश मिश्रा,संजय पेठकर, नांदा गावचे सरपंच मा. गणेश पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, रिना रॉय, मंगला लोणारे, मुरलीधर बोडके, रवी बोडाले, आदी प्रामुख्याने उपस्थित होते सदर काम सिमेंट कंपनीच्या सीएसआर निधीतून मंजूर करण्यात आले असून यामुळे गावातील नागरिक कामगार विद्यार्थी आदींना याचा मोठा लाभ होणार आहे .पावसाळ्यात सदर मार्गावरून अनेकांना चिखलातून जावे लागत होते आता ही समस्या मात्र निकाली लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. संचालन सचिन गोवारदिपे तर आभार संजय ठाकरे यांनी मानले.