खासदार प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मास्क, सेनिटाइझर व फळवाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ फेब्रुवारी २०२१

खासदार प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मास्क, सेनिटाइझर व फळवाटप


        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश तर्फे केंद्रीय माजी मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने शांती विद्या भवन, डिगडोह येथील परिसरात गरजूंना मास्क, सेनिटाइझर व फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मा. सुनीलजी रायसोनी, मा. दिनेशजी केजरीवाल व मा. विकासजी पिंचा यांच्या सौजन्याने व सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०. ३० वाजता प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीनानाथ पडोळे, कामगार नेते बजरंगसिंह पारिहार, प्रदेश सेवादल कार्याध्यक्ष जानबा मस्के, शहर अध्यक्ष मा. अनिलजी अहीरकर व दक्षिण-पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुजित मुन्ना तिवारी व ज्येष्ठ नेते मधुकर भावसार काका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी केले असून या कार्यक्रमाला जि. प. सदस्या सौ. सूचिता ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. रमेश पाटील, सुभाष वराडे व गणेश धानोरकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन तात्यासाहेब मते व लकी कोटगुले यांनी केले आहे.