ग्रामायण गोमय कौशल्य विकास कार्यशाळा रविवारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ फेब्रुवारी २०२१

ग्रामायण गोमय कौशल्य विकास कार्यशाळा रविवारी- ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने आयोजन

नागपूर, १५ फेब्रुवारी

गोमये वसते लक्ष्मी , या उक्तीनुसार सातत्याने कार्य करीत असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने, गोशाळा, गोपालक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी स्थायी प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. याच क्रमात, ग्रामायण गोमय कौशल्य विकास केंद्र, नेत्रवन प्रकल्प, निसर्ग विज्ञानच्या वतीने येत्या रविवारी २१ फेब्रुवारी रोजी ग्रामायण गोमय कौशल्य विकास या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही गोमय वस्तुनिर्मिती कार्यशाळा आहे.  त्यात सहभागी होणाèया प्रशिक्षणाथ्र्यांना, त्यात गोमय प्रकल्पाची माहिती असणारी दहा पुस्तके देण्यात येणार आाहेत. लांबच्या qकवा बाहेरगावाहून येणाèया प्रशिक्षणाथ्र्यांच्या निवास व भोजनाची सशुल्क सोय नेत्रवनला केली जाणार आहे. या एकदिवसीय कार्यशाळेत प्रशिक्षणाथ्र्यांना पणती, फुलवात, शुभचिन्ह, साबण, धुपकांडी, मंजन, किटनियंत्रक, कुंडी, गोकाष्ठ, गोमूत्र अर्क, गोकृपाअमृतम्, सजीव जल, जीवामृत, मच्छररोधक वडी आणि हवन कंडे इत्यादी वस्तूनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमातून, गोधनाच्या माध्यमातून अधिकाधिक हातांना रोजगार मिळावा आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल व्हावी, हे उद्दीष्ट आहे.