वारकरी संप्रदाय प्रदेशाध्यक्ष हभप शेंडे महाराज यांचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ फेब्रुवारी २०२१

वारकरी संप्रदाय प्रदेशाध्यक्ष हभप शेंडे महाराज यांचा सत्कारवारकरी संप्रदाय प्रचारक म्हणून विदर्भ, मध्यप्रदेश उल्लेखनीय कार्य

काटोल  : राष्ट्रीय भागवत धर्म प्रकोष्ठ परिषदचे  मध्यप्रदेश प्रांताध्यक्ष पदावर हभप नारायण महाराज शेंडे  यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार आनंदराव देशमुख महाजन यांचे हस्ते काचुरवाई ता. रामटेक येथे आयोजित कार्यक्रमात शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कचुरवाही येथे स्वर्गीय हभप अशोक वाडीभस्मे यांचे स्मृती भागवत सप्तहाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमद भागवत कथा प्रवक्ता हभप शेंडे महाराज यांचे सुश्राव्य वाणीचा शेकडो भक्तांनी शासनाचे दिशा निर्देशांचे पसलन करून  लाभ घेतला. समारोपीय गोपाळकाल्याचे कीर्तन व सत्कार  सोहळयाने कार्यक्रमाची सांगता झाली. आयोजनास सुभाष वाडीभस्मे, माजी सरपंच सुनील डोकरीमारे, विठ्ठलराव बावनकुळे,प्रशांत वाडीभस्मे,किशोर वाडीभस्मे,डॉ मेंढे, वामनराव देशमुख,मंगेश वाडीभस्मे आदींचे सहकार्य लाभले.