मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ फेब्रुवारी २०२१

मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयरसावली- तालुक्यातील मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा खूमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. १५ जानेवारी रोजी मेहा बुजरुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे सातही उमेदवार विजयी झाले होते. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघाले. मात्र, मात्र, या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद सुधारित आरक्षण येईपर्यंत पुढील काही महिन्यासाठी रिक्त राहणार आहे. आज दि. १७ फेब्रुवारी रोजी उपसरपंच पदासाठी निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंचायत समितीचे बंडू मुरकुटे आणि ग्रामसेवक अनिल टेकाम यांची उपस्थिती होती. यावेळी उपसरपंचपदी शारदा खूमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायत सदस्यात वॉर्ड क्रमांक १ मधून किरण महादेव ठाकरे, भावना योगेश चिमुरकर, वॉर्ड क्रमांक 2 मधून चिमणदास गिरीधर निकुरे, शीतल सुनील ठाकरे, वॉर्ड क्रमांक ३ मधून रुपेश गणपत रामटेके, पंकज गजानन दलांजे यांचा समावेश आहे.