तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ फेब्रुवारी २०२१

तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले निवेदन.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.2 फेब्रुवारी:-
वैभव पवार, नायब तहसीलदार, उमरखेड व गजानन सुरेशो तलाठी यांचे वर रेती माफिया यांनी केलेल्या भ्याड चाकू हल्ला प्रकरणी आज दिनांक 02/02/2021 रोजी तहसीलदार / नायब तहसीलदार संघटना जिल्हा गोंदिया चे वतीने एक दिवस सामूहिक रजा घेऊन काम बंद आंदोलन करण्यात आले. तसेच हल्ले खोरावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी या बाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांचे मार्फत शासनास निवेदन देण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार जिल्हा गोंदिया उपस्थित होते. सर्व अधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि पाठिंबा दिला.