ताडोबा भ्रमंती, किल्ला-स्मारके-मंदीरांचे दर्शन, खान पर्यटनाची संधी @chandrapur-turizam - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ फेब्रुवारी २०२१

ताडोबा भ्रमंती, किल्ला-स्मारके-मंदीरांचे दर्शन, खान पर्यटनाची संधी @chandrapur-turizam

 चंद्रपूर शहरात सुरू व्हावे ‘मायनिंग टुरीजम’


वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेसोबत बैठकीत चर्चाचंद्रपूरः शहरात ताडोबा (व्याघ्र-निसर्ग पर्यटन), चंद्रपूर किल्ला-समाधी (ऐतिहासिक पर्यटन), प्राचीन मंदीरे (धार्मिक पर्यटन) यासह वेकोली के व्दारे ‘खान पर्यटन’ सुरू झाल्यास, चंद्रपूर शहरात एक संपुर्ण ‘पर्यटन झोन’ निर्माण होऊ शकते. याकरीता वेकोली क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेशी इको-प्रो अध्यक्ष बंडु धोतरे यांनी चर्चा केली.

चंद्रपुर जिल्हयामध्ये विपुल वनसंपत्तीसह खनिजसंपत्ती आहे त्यामुळे येथे वेकोलीच्या कोळसा खानी आहेत. यात खुली आणि भुमीगत अशा दोन पध्दतीच्या कोळसा खानीतुन कोळसा उत्खनन केले जाते. या उत्खननासाठी अवजड यंत्रसामृग्रीसह अदयावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातुनही कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. पुर्वीच्या काळी कोणतेही तंत्रज्ञान अवगत नसतांना आणी सुरक्षेची पुरेसी साधने नसताना धोकादायक अश्या ठिकाणी मजुर जिकरीचे काम करीत होते काही प्रमाणात आजही ते सुरू आहे. मजुरांच्या या कौशल्याबद्दल व भुगर्भातील अंतरंगाबाबत जाणुन घेण्यास सामान्य माणुस उत्सुक असतो मात्र सुरक्षेच्या कारणासह व नियमांमुळे सर्वसामान्य व्यक्तीकरीता प्रतिबंधीत क्षेत्र असतात त्यामुळे येथे चालणारे उपकरण, सुरक्षा, कार्यपध्दती, आपातकालीन व्यवस्था निवारण याबाबत सामान्य माणासामध्ये आजही कुतुहुल आहे. आपल्या शेजारी कोळसा खाणी राहुनही त्याबदद्ल सामान्य नागरीक, विदयार्थी व अभ्यासकांना पुरेसी माहीती नाही. भविष्यात खान पर्यटन सुरू झाल्यास अभ्यासांच्या दुष्टीने तसेच चंद्रपूरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने ते सोयीचे होऊ शकते.


जगात आस्ट्रेलीया, दक्षिण आफ्रिका या देशात खान पर्यटन सुरू आहे. आपल्या देशात झारखंड मध्ये सेट्रंल कोलफिल्ड तर्फे तर विदर्भात सावनेर ला वेकोली तर्फे 'खान पर्यटन' सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात असे खान पर्यटन सुरू करण्यात आल्यास व्याघ्र-निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनासोबत एक संपुर्ण 'पर्यटन झोन' विकसीत करण्यास खान पर्यटनामुळे वाव मिळेल. त्यामुळे स्थानिक पर्यटन विकसीत करण्यास जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग, वेकोली व स्थानिक नगर प्रशासनास सहज शक्य होणार आहे.


ताडोबा निसर्ग पर्यटन-ऐतिहासिक वास्तु पर्यटन-प्राचिन मंदीर धार्मीक पर्यटन तथा खान पर्यटन असे पर्यटन झोन निर्माण करण्याची चंद्रपूर शहरास मोठी संधी असुन यात वेकोली व्दारा महत्वाची भुमीका राबवीली जाऊ शकते. याबाबत क्षेत्रीय व्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेशी चर्चा करण्यात आली. वेकोली खान पर्यटनाबाबत सकारात्मक असुन याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. सोबतच जिल्हयातील व्याघ्र, निसर्ग, ऐतिहासीक स्मारक पर्यटनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान इको-प्रो च्या किल्ला स्वच्छता व सुरू असलेल्या किल्ला पर्यटन विषयी माहिती जाणून घेतली, आभास चंद्र सिंग स्वतः किल्ला पर्यटन हेरीटेज वाॅकला येण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी इको-प्रोचे नितीन रामटेके व वेकोलीचे प्रशांत कुडे उपस्थित होते.