विजेच्या खांबावर विजेचा जोरदार शॉक लागून कामगाराचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ फेब्रुवारी २०२१

विजेच्या खांबावर विजेचा जोरदार शॉक लागून कामगाराचा मृत्यू

 विजेच्या धक्क्याने कामगाराचा होरपडून मृत्यूशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : 

आज दि. २४ सकाळी वरोरा तालुक्यातील आनंद निकेतन महाविद्यालय समोरील बोर्डा येथील विकास नगर भागातील विजेच्या  खांबावर दुरुस्ती चे काम करतांना विजेचा जोरदार शॉक लागून कामगाराचा होरपडून मृत्यू झाला.  

मृतकाचे नाव राजू काशीनाथ भोयर वय 30 असून तो चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी असून तो  फुकट नगर येथे रहात होता. मृतक हा नागपूर येथील कंत्राटदार कडे काम करत होता. दुर्घटनेनंतर काही वेळ संपूर्ण वीज पुरवठा खंडित करून मृतकाला पोल वरून उतरवून शवविच्छेदना साठी शव वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी पुढील तपास सुरूचं होता.