भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ फेब्रुवारी २०२१

भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास
आमदार समीर मेघे
भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
वाडी ते खडगाव रस्त्याचे डांबरीकरण दरवर्षी होत होते परंतु या रस्त्यावर भारी वाहनाची रहदारी अधीक प्रमाणात असल्यामुळे पावसाळा आला की खडगाव रस्ता गेला खड्डयात अशा प्रकारे वृत्तपत्रात येणाऱ्या  बातम्या वाचुन मीच  नाराज होत होतो . यावर कायमचा तोडगा काढत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे वारंवार मागणी करून सिमेंटचा रस्ता पूर्णत्वास जात आहे . त्यामुळे खडगाव मार्गाची समस्या कायमची संपणार आहे .वाडी हे विस्तारीत गाव आहे त्यामुळे येथील समस्या संपणार नाही विकासाचे चक्र सुरूच राहणार . नवीन वस्ती तयार झाली की तिथे समस्या उद्भवनार वाडी सोबतच हिंगणा विधान सभा क्षेत्राचा विकास हाच माझा ध्यास राहील असे प्रतिपादन हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी केले . 
मंगलधाम सोसायटी मधील वार्ड क्रमांक १३ मधील सार्वजनिक  शिवमंदीर परिसरात भारतीय जनता पक्षाचे  जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आमदार समीर मेघे यांच्या हस्ते  करण्यात आले . त्यावेळी ते  अध्यक्षस्थानावरुन बोलत होते .सर्वप्रथम महीलांचा महामेळावा घेण्यात आला . महिलांनी एकमेकींना तीळगुळ व ओटी भरुन वाण देण्यात आले. 
व्यासपीठावर भाजपा महीला आघाडी जिल्हाध्यक्षा संध्याताई गोतमारे , जिल्हा महामंत्री राजुताई ( जनक ) भोले ,महामंत्री आंनदबाबु कदम ,वाडी मंडळ उपाध्यक्ष गोविंदराव रोडे, वाडी शहर अध्यक्ष केशव बांदरे, माजी न .प.उपाध्यक्ष नरेश चरडे , माजी  जि. प . सदस्य सुजित नितनवरे , माजी सरपंच देवराव कडु, माजी सभापती कैलाश मंथापूरवार, माजी नगरसेवक राकेश मिश्रा,माजी सभापती कल्पना सगदेव, माजी जि.प. सदस्य सुरेखा रिनके,  वाडी अध्यक्ष मनोरमा येवले,कांचन माने,कमलाकर इंगळे , पुरुषोत्तम गोरे , रामप्रसाद पटले, मनोज रागीट , राजेंद्र तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते .
प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक भाजपा वाडी मंडळ ( अल्पसंख्याक ) अध्यक्ष कमल कनोजे, संचालन  चंद्रशेखर देशभ्रतार तर आभार प्रदर्शन वाडी मंडळ अध्यक्ष प्रमोद गमे यांनी केले .
जनसेवेकरीता जनसंपर्क कार्यालय असेल तरच ते कार्यालय लोकहितार्थ राहते . कमल कनोजे यांची जनसेवा करण्याची तळमळ ही कौतुकास्पद आहे . कोरोना संचार बंदी काळात वाडी परिसरात अन्नदान वाटपाचे कार्य सर्वांत जास्त भाजपाचे कार्यकर्ते यांनी केले . अभिजीत सोसायटीत कमल कनोजे मित्रपरिवारांनी अन्नदान वाटपाचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे केले . हिंगणा मतदारसंघातील ३५ कोटी तसेच वाडीतील दोन कोटी रुपये पळविण्याचे महापाप  महाविकास आघाडी सरकारने  केले असुन खरंच त्यांना विकास करायचा आहे  असे मनोगत आ . समीर मेघे यांनी बोलुन दाखविले . 
 यावेळी भास्करराव रिनके, मनिष गाडे, जितेंद्र रहांगडाले  , राजेंद्र बिसेन, विक्रम तिजारे, राकेश शिवणकर, टिंकु सिंह ,  जतिन कनोजे ,बापू लिमकर, देवराव खाटीक ,समीर मसने , खुशाल सोरते,सुरेश विलोणकर ,नितीन अन्नपूर्णे  ,नितीन सावरकर ,गजेंद्र देवघरे  ,अनिल घागरे ,राकेश चौधरी ,सतिश नांदनकर ,धिरज पिल्ले ,डॉ. प्रशांत मालेवार ,देवराव निकम ,महेश कारेमोरे ,अरूणसिंह ,ताराचंद बागडे ,चंदू वैद्य ,रमेश  लोंढे ,राजू विश्वकर्मा ,कैलास अडले ,प्रवीण राऊत ,बंटी मेहरकुळे ,नरेंद्र नानोटकर , राहूल पाटील,मनोज बांते ,शिवनारायण शर्मा ,जितू राऊत ,बापू राजूरकर  ,ज्ञानेश्वर चोपडे , शेरसिंग पटले ,सुकलाल पटले ,  सुनिल रोकडे , बापू राजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते .