काटोलात एकाच दिवशी दोन सत्ताधारीचे आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ फेब्रुवारी २०२१

काटोलात एकाच दिवशी दोन सत्ताधारीचे आंदोलन# पेट्रोल सोबत वीज दरवाढ कमी करा जनतेची सुटका करा, जन सामन्याचा आवाज


काटोल : शहरात प्रथमच एकाच दिवशी शिवसेना व भाजपा दोन्ही पक्ष आंदोलने छेडणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या सत्ताधारी असून दोघांनीही जनतेला न्याय दिल्यास सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचा सूर पुढे येत आहे. राज्यात शिवसेना व सहयोगी पक्षाची तर केंद्रात भाजपचीसत्ता आहे.दोघांची आंदोलने वेगवेगळ्या मागणी करीता व आंदोलनाचे स्वरूप वेगवेगळे आहे. बघा आता कुणाचे आंदोलनाचा प्रभाव अधिक पडतो दोघांचा पडल्यास जनतेचा जास्त फावणार आहे ही अपेक्षा सुद्धा आहे. वाढत्या महागाईने जनता त्रस्त आहे असा कल सोसिएल मीडियात वारंवार उठत आहे. काटोल भाजप शहर व ग्रामीण पक्ष कार्यकारिणीने ठरविल्यानुसार शुक्रवार दि 5 फेब्रुवारीला आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून प्रथमच महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे ऐतिहासिक पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ काटोलचे सावरगाव रोडवरील तालुका महावितरण कार्यालयावर "टाळा ठोको व हल्लाबोल" आंदोलन आयोजित करण्यात येत असल्याचे भाजप शहर कार्याध्यक्ष विजय महाजन यांनी सांगितले. यावेळी वीज बिलाची सुद्धा होळी करणार असल्याचे माहिती आहे. कार्यकर्ते व जनतेनीसकाळी ११ वाजता काटोल शहरातील व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा ,नगरसेवक व  शेतकरी बंधूंनी महावितरण कार्यालय पावर हाऊस काटोल येथे एकत्र यावे असे आवहान केले आहे.


शिवसैनिकांना निषेध मोर्चा व  निवेदन - 

 मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांच्या आदेशाने केंद्रातल्या सरकारनी विक्रमी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्या निषेधार्थ काटोल तालुक्याच्या वतीने ५ फरवरीलाच दूपरी १२ वाजता तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन स्थानिक  शिवसैनिकांनी केल्याचे सेनेचे जेष्ठ नेते पुरुषोत्तम धोटे यांनी माहिती दिली. सेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनातून जनतेचे (आर्थिक) प्रश्न सुटावे असा सत्ताधारीकडून जनतेचा आवाज सोसिएल मीडियातून येत आहे.