विमाशी संघातर्फे आमदार अॅड . अभिजित वंजारी यांचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ फेब्रुवारी २०२१

विमाशी संघातर्फे आमदार अॅड . अभिजित वंजारी यांचा सत्कार

पदविधर व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार
आमदार अभिजित वंजारी
विमाशी संघातर्फे आमदार अॅड . अभिजित वंजारी यांचा सत्कार
नागपूर / अरुण कराळे (खबरबात )
पदवीधर मतदार संघातील सहा जिल्हयात मोठया प्रमाणात शिक्षक व पदविधर मतदार आहेत पदवीधरांच्या समस्या, शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत मग ती जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा असो वरिष्ठ श्रेणी कि निवडश्रेणी अशा कितीतरी समस्या प्रलंबित आहे त्या सोडविण्या साठी मी कटिबद्ध आहे मग सभागृहांमध्ये मला शासनाचा कितीही विरोध करावा लागला तरी मी मागेपुढे पाहणार नाही. असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना आमदार अभिजित वंजारी यांनी केले .
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर जिल्हा द्वारा नवनिर्वाचित पदविधर आमदार अॅड .अभिजीत वंजारी यांचा माजी शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या हस्ते नागपूर येथील शेतकरी भवन मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देतांना बोलत होते .
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे उपाध्यक्ष आनंदराव कारेमोरे विमाशी संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, , नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे , शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे , जिल्हा कार्यवाह संजय वारकर ,राजेश गवरे, धनराज राऊत ,विष्णु राणे , श्री . येडके लक्ष्मीकांत व्होरा, भूषण बेलेकर, शंकरराव आगलावे, विशाल बंड, सचिन इंगोले, मनोहर वाटणे , विजय ठाकरे , विजय भांगे , श्री .बनसोड , श्री . मानकर ,प्रकाश धरममाळी , श्री .काळमेघ , श्री .धांडे , विशाखा कुंभलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गोतमारे , संचालन संजय वारकर तर आभार प्रदर्शन धनराज राऊत यांनी केले .