असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया -एपीईआय तर्फे झोपडपट्टीतील ४० विद्यार्थ्यांना स्पोर्टसवेअरचे वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ फेब्रुवारी २०२१

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया -एपीईआय तर्फे झोपडपट्टीतील ४० विद्यार्थ्यांना स्पोर्टसवेअरचे वितरण

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया -एपीईआय तर्फे  झोपडपट्टीतील ४० विद्यार्थ्यांना  स्पोर्टसवेअरचे वितरण

 

नागपूर 23 फेब्रुवारी 2021

          असोसिएशन  असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया (एपीईआय)  या देशव्यापी पुरोगामी विचाराच्या  कर्मचा-याच्या संघटनेने  नागपूरातील  शताब्दी चौकाजवळ रामटेके नगर लगत असणा-या   झोपडपट्टी मधील 40 विद्यार्थ्यांना स्पोर्टसवेअरचे (खेळाचा गणवेश ) नुकतेच वितरण केले.याप्रसंगी   नागपूरच्या सामाजिक वनीकरण वनवृत्ताचे संरक्षक डॉ. किशोर मानकर  ( भा.व.से.) यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करतांना  आयुष्यात मोठं होण्यासाठी शिकण्याची जिद्द व चिकाटी असल्यास प्रतिकूल परिस्थिती असली तरी कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होवू शकतोअसे सांगितले.  स्वानुभवातून त्यांनी उपस्थितांना शिक्षणाच   महत्व पटवून दिले .  मुलामूलींशी संवाद साधत दोन गुणवंत विद्यार्थी  यांचे एक वर्षाचे शैक्षणिक  पालकत्व  एपीईआयतर्फे  स्वीकारण्यात आले.   यापुढे सुद्धा वस्तीतील होतकरू मुलांसाठी संघटना मदतीचा हात पुढें करेल असे मानकर यांनी यावेळी सांगितले.

          रामटेके नगर लगत असण-या   या वस्तीत  बरेच जण छोटे व्यवसाय महिला भंगार गोळा करणेधुणीभांडी करुन आपला उदरनिर्वाह करतात तर काही पुरुषाना वाईट सवयी  लागलेल्या असतात . अशा स्थितीमध्ये या  वस्तीत सेवासर्वदा बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून अनुसुचित जातीतील अतिशय मागासलेल्या मांग गारुडी समाजातील गरीब मूलामुलींना शिक्षणखेळ,संगीत सोबतच महीलांना रोजगार व व्यवसायासाठी सक्षम करुन मुख्य प्रवाहात आणण्याचं व महापुरुषांच स्वप्न पुर्णत्वास नेण्याचं  काम केले जात आहे. या संस्थेचे  खुशाल ढाक  हे  होतकरु तरुण मागील 10 ते 12 वर्षांपासून सदर कार्य करीत आहे . खुशालच्या  या समाजकार्याची माहिती  एपीईआयचे प्रा. विलास तेलगोटे  यांना कळाल्यावर त्यांनी खुशालच्या कामात हातभार लावण्यासाठी व वस्तीतील विद्यार्थ्यांना  विविध खेळात रस निर्माण करुन त्यांना खेळात प्राविण्य प्राप्त  करण्यासाठी  एपीईआयसंघटने मार्फत खेळाचे गणवेष वाटप करण्यात आले.   खुशाल ढाक ह्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीसाठी  एपीईआयचे आभार मानले. एपीईआय या संघटनेने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अखंडीत शिक्षणाला हातभार लाभण्याच्या दृष्टीने  मदत व्हावी  याकरीता   महाराष्ट्रमध्यप्रदेशउत्तरप्रदेशछत्तीसगड व पश्चिम बंगाल राज्यात सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील गरीब व होतकरू  अशा हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. 

याप्रसंगी   स्थानिक नगरसेवक   नागेश मानकर संघटनेचे प्रा. विलास तेलगोटेप्रा. डॉ. भावना वानखेडे,  प्रसेनजित गायकवाड उपस्थित होते.