नाशिककरांनी किल्ले जीवधन कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा घेतला ध्यास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ फेब्रुवारी २०२१

नाशिककरांनी किल्ले जीवधन कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा घेतला ध्यास

नाशिककरांनी किल्ले जीवधन कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा घेतला ध्यासजुन्नर /वार्ताहर
स्वराज्य संवर्धन बहुउद्देशिय संस्था नाशिक यांनी आज किल्ले संवर्धन संस्था शिवाजी ट्रेलच्या मार्गदर्शनाखाली किल्ले जीवधनचा कल्याण दरवाजाच्या वरचा पायरी मार्ग जो ब्रिटिश काळात सुरुंग लावून फोडण्यात आला व तो मोठाल्या दगडांनी गाडला गेला होता ते दगड फोडून मोकळा करण्यासाठी आज सुरूवात केली. विशेष म्हणजे रात्री ११ वाजता नाणेघाट येथे मुक्काम करुन आज किल्ल्यावरील सात पाय-यांवरील दगड फोडून व ते दगड किल्यावर संवर्धीत करून ते संध्याकाळी नाशिकला परतले. संवर्धन कार्य चालू असताना संवर्धन कार्य पाहुन राजगुरुनगर च्या एका शिवप्रेमी पर्यटकाने यावेळी संवर्धनासाठी हातभार प्रत्यक्ष लावू शकणार नाही परंतु ५०० रु. संवर्धन कार्यासाठी स्वखुशीने नाशिकरांना देत त्यांच्या शक्तीत त्यांनी भर घातली. आज या संवर्धनासाठी नाशिकच्या
भाऊसाहेब चव्हाणके,भाऊसाहेब कुमावत,सजन फलाने,नितीन ठाकरे,भाऊसाहेब चव्हाणके,भाऊसाहेब कुमावत,सजन फलाने,नितीन ठाकरे,मयुर घुले,प्रविण भेरे,पंकज ठाकरे,प्रविण घोलप ,आशिष घोलप,नितीन देशमुख,करण कानडे,शुभम मेधने,समाधान जाधव,अमोल शिरसाठ,अक्षय उगले,गौरव पाटील,प्रशांत देशमुख,वैभव झनकर,निलेश शिंदे,साईराज जाधव,बापु गांगुर्डे अशा २१ जणांनी योगदान दिले व यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, विजय कोल्हे, प्रशांत केदारी व रमेश खरमाळे यांनी संवर्धनात सहभागी होत मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशिय संस्था नाशिकचे सगळेच सदस्य हा संपूर्ण पायरी मार्ग मोकळा करणार असुन किल्ले संवर्धन व जतनाचा संदेश ते तरुणांना याच माध्यमातून देणार आहेत. खुप खुप हार्दिक शुभेच्छा नाशिककर की आपण १२० कि.मी प्रवास करत एक किल्ले संवर्धनाची भुक गडकोटांवर परीश्रमातुन आपण शिवभक्ती तून भागवत आहात हाच खरा शिवजयंती उत्सव आहे.