भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्ह्याची आढावा बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ फेब्रुवारी २०२१

भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्ह्याची आढावा बैठक

भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्ह्याची आढावा बैठक


दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ ला भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा ओबीसी मोर्चाची संवाद सभा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजी अहिर यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत ओबीसी मोर्च्याच्या कार्यकारिणी संदर्भातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री संजय जी गाते, ओबीसी मोर्चा विदर्भ संपर्क प्रमुख श्री रवीजी चव्हाण, ओबीसी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा संघटक वनीताताई लोंढे, युवा नेते श्री रघुवीर अहिर, भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री शशिकांत मस्के, शैलेश इंगोले, युवा प्रमुख प्रफुल कोकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत महानगरात ओबीसी संघटन मजबूत करने , मंडळ स्तरावर कार्यकारिणी मजबूत करणे, ओबीसी घटकातील जास्तीत जास्त समाजाला कार्यकारणीत स्थान देणे इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय गाते, रवींद्र चव्हाण, वनीताताई लोंढे यांची समयोचित भाषणे झाली
बैठकीत एस टी बोन्डे, विक्रम लाखे, मधुकर राऊत, बंडू गौरकार, महेश कोला वार, उमेश नक्षीने, उत्कर्ष नागोसे, मनोज इटनकर, अभिनव लिंगोजवार आदींची उपस्थित होते.