पळसगांव ग्राम पंचायतीवर भाजपाचा झेंडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ फेब्रुवारी २०२१

पळसगांव ग्राम पंचायतीवर भाजपाचा झेंडा

पळसगांव ग्राम पंचायतीवर भाजपाचा झेंडा


सरपंचपदी संदीप पत्रुजी वेटे यांची तर उपसरपंचपदी नितीन दिलीप वांढरे
बल्‍लारपूर : तालुक्‍यातील पळसगांव ग्राम पंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला असून सरपंचपदी संदीप पत्रुजी वेटे यांची तर उपसरपंचपदी नितीन दिलीप वांढरे यांची निवड झाली आहे. सरपंच व उपसरपंचांची निवड अविरोध झाली. यावेळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्‍य स्‍नेहा चंद्रकांत खाडे, छोटू कवडू दुर्योधन, संगीता मारोती सोयाम, माधुरी सुरेश वांढरे, महादेव विश्‍वनाथ शेवकर यांची उपस्थीती होती. बल्‍लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती भाजपा नेते राजू बुध्‍दलवार यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरंपच व ग्राम पंचायत सदस्‍यांचे स्‍वागत करत शुभेच्‍छा दिल्‍या. पळसगांवच्‍या विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवारृ, राजू बुध्‍दलवार, वैशाली बुध्‍दलवार यांच्‍या मार्गदर्शनात प्रयत्‍नांची शर्थ करू, असे सरपंच संदीप वेटे आणि उपसरपंच दिलीप वांढरे यांनी म्‍हटले आहे