मानेगाव बाजार येथे सरपंचपदी सौ. कविता संदीप डोरले आणि उपसरपंचपदी अतुल मधुकर कानतोडे यांची निवड - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१

मानेगाव बाजार येथे सरपंचपदी सौ. कविता संदीप डोरले आणि उपसरपंचपदी अतुल मधुकर कानतोडे यांची निवडभंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत सौ. कविता संदीप डोरले यांची बहुमताने निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदावर अतुल मधुकर कानतोडे यांना निवडण्यात आले. ही निवडणूक श्री. किशोर हरडे यांच्या नेतृत्वाखाली तर श्री. नामदेव निंबार्ते (माजी सैनिक) यांच्या मार्गदर्शनाखाली  लढविण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य श्री. किशोर हरडे, सौ. मनीषा निंबार्ते, सौ. प्रीती घरडे, सौ. अर्चना ठवकर यांनी या निवडीस सहकार्य केले. नवनिर्वाचित कार्यकारिणीने निवडीचे श्रेय समस्त ग्रामस्थांना दिले. या निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी श्रीराम डोरले, झिबल डोरले, मंसाराम डोरले, गोपीचंद बोन्द्रे, शेखर मते, दिलीप ठवकर, भीमराव ढोमने , रामू बारई, कमलेश वासनिक, जयदेव पडोळे, योगेश पडोळे, सौरभ निंबार्ते, रोहित चांदेकर, नागेश डोरले, भूषण बोरकर, रोहित पडोळे यांनी विशेष सहकार्य केले.