भंडारा- नगरपालीकेच्या हद्दीतल्या २ घोड्यांना ग्लँडर्स या प्राणघातक आजाराची लागण झाल्यानं, त्यांना दयामरण दिलं गेलं. याच महिन्याच्या ६ तारखेला या घोड्यांना हा आजार झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं घोड्यांना दयामरण दिलं गेलं. या घोड्यांना शहरातल्या डम्पिंग परिसरात पुरलं आहे. यानंतर परिसरातल्या एकूण १३ घोड्यांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी हरियाणातल्या हिस्सार इथं पाठवले आहेत.
खबरबात
काव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे.
ई- मेल - khabarbat1@gmail.com