खासदार अशोक नेते यांची दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ फेब्रुवारी २०२१

खासदार अशोक नेते यांची दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती

खासदार अशोक नेते यांची दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती


गडचिरोली :- दि. 2/ फरवरी

भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय संसदीय कार्य मंत्री मा. श्री प्रल्हादजी जोशी यांनी केली आहे.

खासदार अशोक नेते यांची केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदांवर नियुक्ती झाल्याने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न, रेल्वे स्टेशन च्या समस्या, अडचणी तसेच अंडर ब्रिज, फूट ओव्हर ब्रिज च्या संबंधित अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे.